| उरण | वार्ताहर |
शिवरायांना मानवंदना म्हणून उरण तालुक्यातील पागोटे गावात शिव मावळ्यांनी मिठापासुन 39 फुटाची छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी साकारली आहे.
या रांगोळीसाठी 550 किलो मिठ, 55 किलो रंग आणि 12 तासांचा वेळ लागला. रांगोळी काढण्यासाठी नकुल पाटील, संतोष पाटील, पंकज पाटील, भावेश शेळके, दिपक निनावे, विशाल तांडेल, धिरज पाटील, नक्ष पाटील, मंथन पाटील, यश पाटील, हर्षित पाटील, नेहाल जोशी, धैर्य पाटील, केतन मोहिते, साई पाटील, विर पाटील, दिव्यांशू पाटील, सक्षम पाटील, भुमीराज पाटील, गणेश पाटील, विनय पाटील, हरिश्चंद्र पाटील, ऋषी भोईर, श्यामकांत मोकल या सर्वांनी विशेष मेहनत घेतली.