लायन्स क्लब अध्यक्षपदी शिवानी जंगम यांची नियुक्ती

। खोपोली । प्रतिनिधी ।

लायन्स क्लब ऑफ खालापूरच्या अध्यक्षपदी खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, सक्रेटरी रामचंद्र गायकवाड, खजिनदारपदी किशोर पाटील यांची सलग दुसर्‍यांंदा नियुक्ती करण्यात आली आहे. पदग्रहण सोहळा गुरूवारी (दि.25) वरदविनायक मंदिराच्या सभागृहात संपन्न झाला. पनवेल लायन्स क्लबचे राजेश प्रजापती यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

या कार्यक्रमासाठी जीएसटी चेअरमन गनात्री, डिस्ट्रिक्ट हॅन्डीकॅप चेअरमन पंकज शर्मा, डॉ.ज्योती देशमाने, झोनर चेअरमन अतिक खोत, सुयोग पेंडसे, उपनगराध्यक्ष संतोष जंगम, केटीएस मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील, लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे नारायण कट्टी, अजय पिल्ले, रमेश पाटील, विशाल दिमानी यांच्या लायन्सचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ खोपोली यांच्या सौजन्याने हॅन्डीकॅप विभागाचे पंकज शर्मा यांच्या सहकार्यातून माजगांव अंबिवली येथील दिव्यांग नामदेव जाधव यांना सायकल भेट दिली. महड येथील भागवत प्रतिष्ठानमधील विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर देण्यात आली. खोपोलीतील उद्योजक यशवंत साबळे,रेणुका साबळे, मुलगा विक्रांत साबळे यांना लायन्सचे सदस्य करण्यात आले.

Exit mobile version