| खारेपाट | वार्ताहर |
रा.जि.प. माजी सभापती दिलीप भोईर पुरस्कृत ओरिजनल खारेपाट प्रिमियर लीग नाईट क्रिकेट स्पर्धेत शिवबा हाशिवरे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असून, संघास 1 लाख 25 हजार रुपये पारितोषिक व ओरिजनल खारेपाट प्रीमियर चषक देण्यात आला. तर, उपविजेता मिहीर स्पोर्ट संघास 75 हजार रुपये पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांक कृष्णा नवखार स्पोर्ट्स संघास 50 हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली.
स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज कुणाल पाटील (90 धावा) हाशिवरे संघ तसेच उत्कृष्ट गोलंदाज मंथन डाकी (12 गडी बाद), त्याचप्रमाणे मालिकावीराचा किताब अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या राजेश पाटील याला (104 धावा, चार गडी बाद) प्रदान करण्यात आला. या खेळाडूंचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
स्पर्धेचे पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते नितीन पाटील, किर्ती शहा, अजित पाटील, दर्शन डाकी, गोरक कडवे, कपिल ठाकूर, खारेपाट ओरिजन प्रिमियर लीग स्पर्धेचे आयोजक सर्व सभासद व खेळाडू उपस्थित होते. भव्य दिव्य स्पर्ध हाशिवरे येथील बालवीर भव्य मैदानात प्रकाश झोतात तीन दिवस खेळाण्यात आल्या. सुमारे 390 खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक हजर होते.