12 किल्ल्यांचा समावेश; केंद्र सरकारकडून युनेस्कोला प्रस्ताव सादर
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं युनेस्कोला नामांकन पाठवलं आहे. या मराठाकालीन किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, मुल्हेर, रांगणा, अंकाई-टंकाई, कासा, सिंधुदुर्ग, अलिबाग, सुवर्णदुर्गसह खांदेरी किल्ल्यांचा समावेश आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रत्येक देश नामांकनं पाठवतो. यावर्षी मराठाकालीन किल्ल्यांचा प्रस्ताव भारताकडून युनेस्कोकडं पाठवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडसह साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा या नामांकनामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. हे किल्ले सतराव्या ते एकोणिसाव्या शतकात बांधले गेलेले आहेत. हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा आणि अभेद्य तटबंदीचा भक्कम पुरावा आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, युनेस्कोच्या या यादीत सध्या भारतातील 42 वारसा स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रीय राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीतील तीन सांस्कृतिक स्थळांचा समावेश आहे. हे किल्ले मराठा राजवटीमधील सामरिक शक्तींचे दर्शन घडवणारे आहेत. हे किल्ले मराठा शासकांच्या असाधारण पराक्रमाने नावारुपाला आलेले आहेत.
महाराष्ट्रात एकूण 390 किल्ले महाराष्ट्रात 390 हून अधिक किल्ले आहेत. त्यापैकी फक्त बारा किल्ले मराठा काळातील असल्याचं सांगितलं जात आहे. यापैकी आठ भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित आहेत. यामध्ये शिवनेरी किल्ला, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजीचा किल्ला यांचा समावेश आहे. तर उर्वरित साल्हेर किल्ला, खांदेरी किल्ला, राजगड, प्रतापगड हे आधीपासूनच महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयानं संरक्षित केले आहेत.
युनेस्कोच्या प्रतिष्ठेच्या व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन मिळणं, अत्यंत अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या नामांकनासाठी पहिलं पाऊल टाकलं आहे. रयतेचं शौर्य, पराक्रम, कल्याणासाठी या किल्ल्यांचा वारसा तसंच ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यांचा वारसा स्थळात समावेश होईल, अशी मला खात्री आहे.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री