शिवसेनेचा भाजपला ‘प्रसाद’

धमकी देऊ नका एकच थापड दिली तर पुन्हा उठणार नाही; उद्धव ठाकरेंचा इशारा
मुंबई | प्रतिनिधी |
प्रसंग आला तर शिवसेना भवनावरही हल्ला करु या भाजप आ.प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटू लागले असून,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केवळ धमकी देऊ नका,एकच थापड दिली तर पुन्हा उठणार नाही,असा गर्भीत इशाराच भाजपला दिला आहे.
मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचं बांधकाम केलं जाणार आहे. बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.यावेळी ठाकरे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवणींना उजाळा दिला.


आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केलं की भीती वाटते. तो डॉयलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता पण अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत.जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ.
उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री

प्रसाद लाड यांचा माफीनामा
आपली चूक लपविण्यासाठी लाड यांनी माध्यमांवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. ती बातमी विपर्यास करून दाखवली आहे, असे सांगत मला कुठल्याही प्रकारे शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनाप्रमुखांनी बांधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात लाड यांनी माफीनामा दिला आहे.

तोडफोड करणं आमची संस्कृती नाही, आम्ही तोडफोड करत नाही, तसेच, आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, आलं तर सोडत नाही.
देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्षनेते

Exit mobile version