शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला होतेय मुलाकडूनच मारहाण?


विजय शिवतारे यांना ह्रदयविकाराचा झटका, भावांमुळे वडिलांची ही अवस्था झाल्याचा मुलीचा आरोप

। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेनेचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे ह्रदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईमधील ब्रीच कॅण्डी रुग्णालयाच्या आयसीयूत ते दाखल आहेत.

यादरम्यान त्यांच्या मुलीने फेसबुकवर पोस्ट टाकत गंभीर आरोप केले असून यामुळे शिवतारे कुटुंबातील कलह समोर आला आहे. मुलांनी दिलेल्या त्रासामुळेच त्यांनी ह्रदयविकाराचा झटका आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच आपल्या भावांच्या संपत्तीच्या लोभापायी वडिलांची ही दयनीय अवस्था झाल्याचं म्हटलं आहे. ममता लांडे-शिवतारे यांनी ही पोस्ट लिहिली असून विजय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केली आहे. ममता लांडे-शिवतारे या आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत.

माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून वडिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप ममता यांनी केला आहे. तसंच प्रकृती नाजूक असतानाही मानसिक दबाव अजून वाढवून त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरु होते असाही आरोप त्यांनी केला आहे. तसंच आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय व विनस व त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली.

तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे असाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी काही प्रश्‍नदेखील उपस्थित केले आहेत.

Exit mobile version