कोपर्लीत शिवसेनेच्या विजयाचा श्रीगणेशा

। नंदुरबार । प्रतिनिधी ।
कोपर्ली गटात शिवसेनेने विजयाचा श्रीगणेशा केला. राम रघुवंशी यांनी पंकज गावित यांचा 3 हजार 2 मतांनी पराभव केला. एकीकडे विजयकुमार गावित यांच्या मुलीचा विजय झाला असताना, दुसरीकडे पुतण्या हरल्याने नंदुरबारमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. माजी मंत्री आणि भाजपचे बडे नेते विजयकुमार गावित यांच्यासाठी कही खुशी, कही गम असं चित्र आहे. कारण मुलगी सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला असताना, पुतण्याचा मात्र पराभव झाला आहे. विजयकुमार गावित यांचा पुतण्या पंकज गावित यांचा शिवसेनेचे उमेदवार राम चंद्रकांत रघुवंशी यांनी पराभव केला.

Exit mobile version