पालघर जिल्हा परिषदेत भाजपला धक्का; नंडोरे देवखोपच्या जागेवर शिवसेनेचा भगवा, डहाणूत गावितांच्या मुलाचा पराभव

। पालघर । प्रतिनिधी ।
नंडोरे देवखोप जिल्हा परिषद गटासाठी शिवसेनेच्या उमेदवार नीता पाटील उभ्या होत्या. पाटील यांनी प्रचाराचं नेटकं नियोजन केल्यामुळे त्यांचा विजय झाला. नीता पाटील यांना 4072 मते मिळाली. राष्ट्रवादीच्या कविता खटाळी यांनी दुसर्‍या क्रमांकाची मते घेतली आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी नसतानाही शिवसेनेने भाजपचा पराभव केला आहे. या जागेवर भाजप थेट तिसर्‍या जागेवर फेकला गेला आहे. या पूर्वी या जागेवर भाजपच्या अनुश्री पाटील निवडून आल्या होत्या. या विजयानंतर नीता पाटील यांना अश्रू अनावर झाले. पक्षाने दाखवलेला विश्‍वास, शिवसैनिकांनी घेतलेली मेहनत आणि मतदारांची साथ यामुळेच आपला विजयी झाल्याचं पाटील यांनी सांगितलं.

खासदाराचा मुलगा पराभूत
डहाणू ताल्युक्यातील वणई जिल्हा परिषद गट हे राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. वणई गटात सध्याचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी कट्टर शिवसैनिकांना डावलून, आपला राजकीय वारसदार म्हणून स्वत:चा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरविले होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर होता. यामुळं रोहित गावितांचा पराभव झाला. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, मनसे यांनी ही आपला उमेदवार देऊन प्रतिष्ठा पणाला लावली होती.

Exit mobile version