| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शिवशाही बसने दुचाकीला समोरून ठोकर दिल्याने कार्लेखिंडीत अपघात झाला. अलिबाग हून पनवेल कडे निघालेल्या भरधाव शिवशाही बसने चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या के टी एम दुचाकीला चुकीच्या बाजूने जात ठोकर दिली. दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी नवी मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे तसेच दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर तर बसचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली होती.