। धाटाव । वार्ताहर ।
धाटाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.विविध उपक्रमांमुळे गावात शिवशाही अवतरल्याचा भास निर्माण झाला होता. प्राध्यापक विक्रम कदम यांनी शिवशाहीवर आपले व्याख्यान दिले.
यावेळी व्यासपीठावर विजय मोरे, प्रदीप देशमुख,प्रशांत देशमुख,चंद्रकांत मालुसरे,किशोर रटाटे,सूर्यकांत मोरे,सुहास येरूनकर,अनंता म्हस्कर,दिलीप धोंडगे,गणेश म्हस्कर,संतोष रटाटे,विवेक जोशी,योगेश भगत यांसह मान्यवर उपस्थित होते.याठिकाणी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तर मिरवणुकीत विविध वेशभूषा केलेल्या कलावंतांना सन्मानित करण्यात आले.
शिवजयंती उत्सव सोहोळ्यात रायगड वरून आणलेल्या शिवज्योतीचे जागोजागी स्वागत करण्यात आले.तर विधिवत पूजा झाल्यानंतर छत्रपती शिवारायांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी यांसह विविध जयघोषाने परीसर दणाणला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत पाशिलकर, मिथुन मालुसरे, अभिजित मोरे, धनंजय रटाटे,नरेश म्हस्कर, केतन धोंडगे, ज्ञानेश्वर जाधव, योगेश म्हस्कर, शुभम मोरे, सागर शेलार यांसह सहकारी वर्गाने विशेष मेहनत घेतली.प्राध्यापक विक्रम कदम यांनीही या तरुणांचे उत्तम नियोजन केल्याबद्दल विशेष कौतुक केले.