| मुंबई | वृत्तसंस्था |
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सततच्या दुखापतीने त्रस्त असून, तो या हंगामात आपली किमया दाखवू शकला नाही. पुढील उपचारासाठी तो आपल्या मायदेशी परतणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या पुढील संपूर्ण हंगामातून तो बाहेर गेला आहे. मुंबईसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबईला आधीच वेगवान गोलंदाजांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. जोफ्रा आर्चरला या लीगमधील संपूर्ण सामनेही खेळता आले नाही आणि आता आर्चरऐवजी मुंबईने ख्रिस जॉर्डनचा संघात समावेश केला आहे.