| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा येथील शेतकरी पक्षाचे ज्येष्ठ नेते, रेवदंडा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, तसेच अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीचे व सुमित्र पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष कमळाकर उर्फ आप्पा साखळे यांचे मुंबई येथील खासगी रूग्णालयात निधन झाले, निधनासमयी त्यांचे वय 74 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संपुर्ण रेवदंडा सहीत पंचक्रोशीत हळहळ व्यक्त झाली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात, विविध स्तरातील मंडळीने त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.






