50 पैकी 16 मृतदेह बेवारस
| जळगाव | वृत्तसंस्था |
गेल्या आठ दिवसापासून जळगाव जिल्ह्यात विविध कारणांनी मृत पावलेले 50 मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. यातील सोळा मृतदेह हे बेवारस असल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळ्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात विविध कारणांनी तब्बल 50 व्यक्तींचा मृत्यू असून जळगावमधील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. जळगाव जिल्ह्याच्या विविध भागांत आढळून आलेले हे सर्व मृतदेह पोलिसांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागृहात दाखल करण्यात आली आहे. यासर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. विविध आजारांनी ग्रस्त असलेले आणि रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्याने यासर्व व्यक्तींचा उन्हाच्या तीव्रतेने मृत्यू झाल्याची बाब शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे.
या सगळ्या मृतदेहावर मंत्री गिरीश महाजन यांच्या जी. एम फाऊंडेशन यांच्या माध्यमातून दफन विधी केले जाणार आहेत. त्याच बरोबर रस्त्यावर असलेल्या बेवारस नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाणी निवास व्यवस्था करण्यात येणार असल्याच सांगण्यात येत आहे.