| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत पाच वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. आरएके मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या शिवडी परिसरात पाच वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पाच वर्षीय चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या इसमाने अत्याचार केला आहे. चिमुरडी अंगणात खेळत असताना तिला उचलून स्वत:च्या घरी नेलं. त्यानंतर या 30 वर्षीय शेजाऱ्याने मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी आरएके मार्ग पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी 30 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. भारतीय न्याय आणि पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे. पाच वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.