| हवेली | वृत्तसंस्था |
पुणे – सोलापूर महामार्गावर कदमवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ग्रँड हॉटेलच्या समोर धावत्या बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे नुकसान झाले आहे. घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बस हैदराबादवरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमध्ये एकूण 17 प्रवासी प्रवास करीत होते.
कदम वस्ती ग्रामपंचायत येथे आले असता गाडीचा टायर फुटला व गाडीने पेट घेतला. या आगीत गाडीचे पूर्ण नुकसान झाले असून पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. यावेळी महामार्ग दोन्ही बाजुंनी बंद ठेवण्यात आला होता.