धक्कादायक! ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले

| पनवेल | प्रतिनिधी |

किसन सोमकुवर (79) हे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना एकाने आपण पोलीस असल्याची त्यांच्याकडे बतावणी करून सेक्टर 16 मध्ये एकाची हत्या झाली असून नाकाबंदी सुरू आहे. तरी तुम्ही तुमच्याकडील सोन्याचे दागिने काढून रुमालात ठेवा, असे सांगून सोमकुवर व त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने आपल्या ताब्यातील दागिने काढून ठेवले असता त्या तोतया पोलिसाने हातचलाखीने ते दागिने लंपास केले आहेत. सोमकुवर घरी गेल्यावर रुमालात दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात दिली आहे.

Exit mobile version