| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नोकरी देतो अस सांगून एका महिलेला गेस्ट हाऊसमध्ये भेटायला बोलावले. त्यानंतर तिच्या कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे.
लखनौमधील बिजनौर पोलीस स्टेशन परिसरात एका मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. तरुणीला नोकरीच्या नावाखाली गेस्ट हाऊसमध्ये बोलावून कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकले त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पीडिता शुद्धीवर आल्यानंतर तिला तिच्यासोबत अघटीत घडल्याची जाणीव झाली. आरोपीने तिच्यासोबत केलेल्या क्रूर कृत्याचा व्हिडीओही बनवला होता. जेव्हा पीडितेने आरोपीला विरोध केला, तेव्हा आरोपी अभिमन्यू सिंहने तिला धमकी दिली कोणाला काही सांगितले तर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल. यानंतर पीडितेने घरी पोहोचून संपूर्ण घटना तिच्या पतीला सांगितली. पतीने आपल्या पत्नीला घेऊन पोलिसांत धाव घेतली. सध्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी तपास सुरू आहे.