| कोल्हापूर | वृत्तसंस्था |
कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जवानाचे हातपाय बांधून त्याला विष प्राशन करण्यात आले. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडहिंग्लज तालुक्यातील नूल गावामध्ये ही घटना घडली आहे. जवानाला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पत्नीसह अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सुट्टीवर आलेल्या भारतीय सैन्यातील जवानाच्या बाबतीत असा प्रकार का घडला? याची संपूर्ण माहिती अद्याप कळू शकलेली नाही. हायपाय बांधून विष पाजल्यामुळे प्रकृती खराब झालेल्या या जवानावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत.