धक्कादायक! कामार्ली येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील कामार्ली येथील बँक ऑफ इंडिया बँकेचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्याची घटना गुरुवारी पहाटे घडली आहे. पुणे जिल्ह्यातील रहिवाशी संतोष कांबळे (वय 34 ) हा आरोपी व त्याचा साथीदार कामार्ली येथील एटीएम वर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आले होते. त्याच वेळेला रात्रीच्या गस्तीवर असलेले पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्र पोळ व त्यांच्या सहकार्याने नागरिकांच्या मदतीने आरोपी संतोष कांबळे याला ताब्यात घेतले तर त्याचा दुसरा साथीदार मात्र यावेळी पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. या संदर्भात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून अधिक तपास पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तडवी हे करत आहेत.

Exit mobile version