| इंदापूर | वृत्तसंस्था |
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात एका विवाहित महिलेचा खून झाल्याची घटना घडली आहे. सुनिता दादाराम शेंडे (33), रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर रा. सुरवड, ता. इंदापूर जि. पुणे याच्या विरोधात इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी स्वतःहून इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी (दि. 4) रात्री 8 ते 8:30 च्या दरम्यान निमगाव केतकी-सराफवाडी रोडवरील अजिनाथ मोरे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये ज्ञानेश्वर रासकर याने अज्ञात कारणामुळे सुनिता शेंडे यांच्या डोक्यात, पोटात, छातीवर आणि हातावर चाकूने वार केले. यात सुनिता शेंडे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत महिलेचे पती दादाराव निवृत्ती शेंडे (37), व्यवसाय बिल्डिंग कंट्रक्शन इंदापूर तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे करीत आहेत.






