| पुणे | वृत्तसंस्था |
पुण्यातील एका धक्कादायक घटनेने सर्व परिसर सुन्न झाला आहे. पुण्यात आकाश पाळण्यात बसताना शॉक लागून 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. पुण्याच्या कात्रज परिसरात ही जत्रा भरविण्यात आली होती. कात्रज कोंढवा रस्त्यावर फॉरेन सिटी एक्झिबिशन नावाने पुण्यात फनफेअर भरवण्यात आली. त्यावेळी आकाश पाळण्यात बसताना गणेश पवार (09) मुलाचा लोखंडी जाळीला स्पर्श झाला. त्या जाळीमध्ये विद्युत प्रवाह असल्याने तो शॉक लागून जमिनीवर कोसळला. त्याला बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फनफेअरचे आयोजक तसेच आकाश पाळण्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान शवविच्छेदनानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल, असं भारती विद्यापीठ पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
धक्कादायक! जत्रेत शॉक लागून मुलाचा मृत्यू
