धक्कादायक! नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने म्हणून केली आत्महत्या

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने घरात गळफास घेवून आत्महत्या केली. सफाई कामगार म्हणून सेवेत असलेल्या गणेश जैतू जाधव यांनी तडकाफडकी आत्महत्येचा निर्णय का घेतला, याबाबात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. याबाबत परिसरात विचारपूस केली असता अकरा महिन्याचा पगार नसल्याने आणि पत्नीसोबत भांडण झाल्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी गणेश जाधव हा सम्राट नगर येथे वास्तव्यास होता. शनिवारी (दि.10) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. रात्रपाळी करून घरी आलेला हा कर्मचारी सकाळी घराचा दरवाजा उघडत नव्हता. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी खिडकीतून वाकून पाहिले असता गणेश जाधव याने घराच्या पत्र्याच्या शेडला असलेल्या लोखंडी पाईपाला लाल ओडणीच्या साहाय्याने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. याबाबत माहिती नागरिकांनी नेरळ पोलीस ठाण्यात देताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

मयत गणेश जाधव याला आर्थिक चणचण असल्याचे बोलले जात आहे. नेरळ ग्रामपंचायतमध्ये सफाई कर्मचारी असलेल्या या तरुणाला गेले अकरा महिने पूर्ण पगार मिळाला नव्हता. त्यामुळे त्याने बँकेकडून घेतलेले कर्जाचे हप्ते न भरल्याने बँकेकडून त्याला नोटिसा आल्या असल्याची माहिती समोर येत आहे. पगाराशिवाय इतर कोणताही आर्थिक स्त्रोत नसल्याने गणेशला दोन लहान मुलांचे शिक्षण, घरातील घरखर्च चालवणे कठीण जात होते. तर शुल्लक कारणावरून आर्थिक विवंचनेतून पत्नीसोबत चिडचिड झाल्याने अखेर गणेश जाधवने आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी शुक्रवार रात्रपाळी करून घरी आल्यावर सकाळी उठून काही मित्रांना तो भेटला होता. नेहमीप्रमाणे हसत-खेळत तो आपल्या कामावरील मित्रांनाही भेटला होता. पत्नीच्या भांडणाचा राग मनात धरून दारुच्या नशेत त्याने स्वःताला संपविले. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version