| अकोला | वृत्तसंस्था |
अकोल्यात कुलरच्या विजेचा धक्का लागून व्यक्तीला आपला जिव गमवावा लागलाय आहे. घरात लावलेल्या कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने एका इसमाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. नितीन गजानन वानखडे मृत्य व्यक्तिचे नाव आहे.
अकोला येथील नितीन गजानन वानखडे (38) हे कामावरुन घरी परतले असता, घरातील कूलर बंद पडला म्हणून त्यांनी कूलर चालू करायचा प्रयत्न केला. कूलरला स्पर्श करताच त्यांना विजेचा धक्का बसला आणि कूलर त्यांच्या अंगावर पडला. अकोला जिल्ह्यातील मळसुर गावात ही घटना घडली आहे. गेल्या महिनाभरातील ही सलग तिसरी घटना असल्याने कूलर उन्हाळ्यात दिलासादायक असला तरी, तो काही अंशी जीवघेणा तर ठरत आहे. विजेचा धक्का लागून आणखी एका व्यक्तीला आपला जिव गमवावा लागला आहे.
दरम्यान, त्यांना विजेचा जोरदार शॉक लागला. ही घटना त्यांचे वडील आणि त्यांच्या पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ विद्युत पुरवठा खंडित केला. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीच्या नितीन यांना उपचार्थ रुग्णालयात नेले, मात्र तेथे पोहोचण्यापूर्वी वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे.