धक्कादायक! मतदान केंद्राबाहेरच मतदाराने घेतला अखेरचा श्वास

| महाड | प्रतिनिधी |

महाडमध्ये मतदान केंद्राबाहेर मतदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रकाश चिनकाटे असे या मतदाराचे नाव असून, दाभेकर कोंड येथील मतदान केंद्राबाहेर उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

रायगड जिल्ह्यात उष्णतेचा पारा 41 डिग्रीच्या पुढे गेला असून सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत. महाड तालुक्यातही उष्म्याचा पारा आज सकाळपासून 39 डिग्रीच्या पुढे असून किंजळोली बु. दाभेकर कोंड येथील प्रकाश चिनकाटे हे सकाळी 9 वाजता दाभेकर कोंड येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते.

मात्र, मतदान केंद्राबाहेरच उन्हाच्या त्रासाने ते चक्कर येऊन खाली कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version