| पंढरपूर | प्रतिनिधी |
पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आषाढी एकादशीच्या या काळात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना पंढरपूरच्या कासेगाव येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात देशभरातील भाविकांनी विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. या पवित्र प्रसंगी पंढरी नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली होती. वारकऱ्यांनी पांडुरंगाच्या दर्शनाचा आनंद लुटला. आषाढी वारीच्या समारोपादरम्यान कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची दु:खद घटना घडली. घरगुती वादातून पत्नीने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून जीवन संपवले, तर पतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आसबे कुटुंबातील या चारही सदस्यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत.