रूट कॅश ऑफिसरनेच काढले लाखो रुपये; श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
एच.डी. एफ.सी. बँकेच्या ए.टी.एम मध्ये कॅश भरताना अपहार झाल्याची घटना घडली असून सिक्युर व्हॅल्यू इंडिया लि. भांडुप कंपनीचे पेन रूट कॅश ऑफिसर निखील नाडकर, अनिकेत सापटे यांनी एच.डी.एफ.सी. बँक ए.टी.एम. श्रीवर्धन तसेच बोर्ली बँक ए.टी.एम. मधील एकूण 41,62,500 रुपये काढून घेऊन अपहार केला. तसेच ए.टी.एम. मध्ये रक्कम भरल्याच्या खोट्या नोंदी, तसेच ए.टी.एम. मशीन मध्ये व कॅश बॅलेंसिंग रिपोर्ट मध्ये अपहार करून ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून कंपनीची व बँकेची फसवणूक केल्याची तक्रार, ए.टी.एम. मधील रक्कमेचे ऑडिट केल्यानंतर हरेश यशवंत वाघमारे यांनी श्रीवर्धन पोलीस स्टेशन मध्ये एस.जी.गुरव यांच्याकडे केली असून अधिक तपास आर.बी.अल्हाट करीत आहेत. याबाबत श्रीवर्धन पोलीस स्टेशन पोलीस ठाण्यात भा.द.वी.क 420, 408, 465, 467, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.