| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील बांधण येथील कबड्डीपटू सिकंदर केळकर ( वय 33) याच्या आकस्मित निधनाने कबड्डी जगताला मोठा धक्का बसला आहे. शिवाई बांधण क्रीडा मंडळाच्या संघातून कबड्डीचा श्रीगणेशा करणारा सिकंदर महिंद्रा अँड महिंद्रा या व्यावसायिक संघातून रायगडचे नाव शिखरावर नेले. काही दिवसांपासून आजारी असलेल्या सिकंदर यांचे मंगळवारी (दि. १२) सांयकाळी 7 च्या सुमारास निधन झाले. त्याच्या पश्च्यात मुलगा, पत्नी, आई असा परिवार आहे. त्याच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या निधनाने कबड्डी प्रेमींमधून शोक व्यक्त केला जात आहे.