| रत्नागिरी | प्रतिनिधी |
रत्नागिरी तालुक्यातील मशवी तिठा ते नारिंग्रे या मार्गावर धावत्या कारने पेट घेतल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. या घटनेत कार जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
ही कार मशवी तिठा ते नारिंग्रे या मार्गावरून जात असताना मोटारीच्या पुढील भागातून आग लागल्याचे कार चालकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे प्रसंगावधान राखून चालकाने गाडी बाजूला थांबवून ते खाली उतरले. दरम्यानच्या काळात गाडीने पेट घेतला. यामध्ये कार जळून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती येथील पोलिसांना देण्यात आली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुधीर कदम करीत आहेत.






