धक्कादायक! …म्हणून नवरा- बायकोने केला आत्महत्येचा प्रयत्न

Yellow crime scene do not cross barrier tape in front of defocused background. Horizontal composition with selective focus and copy space.

। पनवेल । वार्ताहर ।
बांधकाम व्यावसायिकाने ठगावल्यामुळे पनवेल शहरातील डेहपे परिवारातील नवरा-बायकोने आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. एक व्हिडिओ काढून या इसमाने फिनाइल हे विषारी औषध पिवून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला.
शहानवाज हुसेन मिया पटेल व अशपाक हुसेन मिया पटेल या बांधकाम व्यावसायिकाने फसविले तसेच याबद्दलचा न्याय मिळत नसल्याने हताश झालेल्या सोहेल मुस्ताक डेहपे व शाइस्ता सोहेल डेहपे या जोडप्याने जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या महामारीमुळे जीवन जगणे मुश्कील झाले असून आपले पैसे परत मिळावेत म्हणून या दांपत्याने बांधकाम व्यावसायिक शाहनवाज मिया पटेल यांच्याकडे आटोकाट प्रयत्न केले. मात्र या बांधकाम व्यावसायिकाने त्यांना पैसे देणार नसल्याचे सांगताच आता आपले सर्व काही संपले असेच त्यांना वाटू लागले अखेर एक व्हिडिओ काढून या इसमाने फिनाइल हे विषारी औषध पिवून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर त्यांना पनवेलमधील एका खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

Exit mobile version