धक्कादायक! मेहुण्याने केले कोयत्याने वार

| पनवेल | वार्ताहर |

धारदार कोयत्याने वार करून कोन येथील दीपक म्हात्रे यांना जखमी केल्याप्रकरणी मेहुणा राजेश पवार याच्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोन येथील दीपक जनार्दन म्हात्रे यांची बहिण दिपाली हिचे 2014 मध्ये बेलवली येथील राजेश जनार्दन पवार यांच्या सोबत लग्न झाले. राजेश हा त्यांच्या बहिणीस सांभाळत नसल्याने बहिणीने पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. दिवाळीचा फराळ घेऊन दीपक म्हात्रे व त्यांची पत्नी अक्षदा हे बेलवली येथे राहणार्‍या बहिणीकडे निघाले. ते येण्यापूर्वी राजेश व त्यांचा मोठा भाऊ घरात होते. यावेळी राजेशने दिपालीला पैसे मागण्यावरून शिवीगाळ करू लागला. यावेळी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असताना त्याने दिपालीच्या लाथ मारली. यावेळी दीपक व राजेशचा भाऊ जगन यांनी राजेशला घराबाहेर काढले. यावेळी राजेशने दीपकच्या कानाखाली मारली व घरात असलेला कोयता घेऊन दिपकच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस वार केले.

यावेळी त्यांची पत्नी अक्षदा व दिपाली सोडवण्यास आली असता, राजेशने पत्नीच्या उजव्या हातावर कोयत्याने वार केले. यात अक्षदा जखमी झाली. त्यानंतर राजेश पळून गेला. बहिणीचा पती राजेश पवार याने दीपक म्हात्रे यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले आहे.

Exit mobile version