धक्कादायक! स्कूल व्हॅन चालकाकडून साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

| जळगाव | वृत्तसंस्था |

भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरीत शिकणाऱ्या साडेतीन वर्षीय चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने गैरकृत्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी विरोधात पोस्कोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरीत शिकणाऱ्या साडेतीन वर्षीय मुलीसोबत स्कूल व्हॅन चालकाने शाळेच्या बाहेर स्कूल व्हॅनमध्ये चिमुकलीला बसवले. त्यानंतर चिमुकलीसोबत गैरकृत्य केले. चिमुकली घरी आल्यानंतर पालकांच्या हा प्रकार लक्षात आला. यावेळी पालकांनी तात्काळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलिसांनी संशयित स्कूल व्हॅनचालक प्रसाद हिरामण चौधरी यास अटक करून त्याच्या विरुद्ध पोस्कोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. लकाला पोलिसांनी अटक केली असून या गुन्ह्यात अल्पवयीन तरुणांचाही सहभाग असल्याचे दिसून येत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Exit mobile version