। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात तिघांचा आकस्मात मृत्यू झाला आहे. यातील दोघांनी विषारी औषध तर एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या तिन्ही घटना शुक्रवार व शनिवारी या दोन दिवसात घडल्या आहेत.
याप्रकरणी अलिबाग व रेवदंडा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वढाव बुद्रुक येथील 31 वर्षीय तरुणाने शेतामध्ये जाऊन गवत मारण्याचे औषध खाल्ले. त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. तालुक्यातील बोरपाडा येथील 26 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच कार्ले खिंडी येथे देखील एका तरुणाने विषारी औषध खाऊन आपले जीवन संपविल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.







