| कोलाड | वार्ताहर |
माणगाव तालुक्यातील घोटवळ येथील तरुण योगेश मारुती फराडे (38) याचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.10) रोजी योगेश हा मौजे धगडवाडी ता. रोहा येथे पोलावर नवीन तार टाकण्याचे काम करीत असतांना त्याला विजेचा शॉक लागला. त्याला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. त्यांच्या मृत्यूची नोंद कोलाड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा पंचनामा पोसई खतीब रोहा पोलीस ठाणे यांनी केला असून अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार एन ए शिर्के, अंमलदार सी. जी कुथे करीत आहेत.