शूटिंग बॉलला चांगला लोकाश्रय

खेळाडूंच्या भवितव्यासाठी एकच संघटना हवी
चंद्रकांत मोकल यांचे प्रतिपादन

| खारेपाट | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्यात व राज्याच्या बाहेर शूटिंग बॉल खेळाला चांगला लोकाश्रय आहे. मात्र, राष्ट्रीय स्तरावर या खेळाची एकच संघटना नसल्याने या खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळत नाही, त्यामुळे चांगला खेळ करूनदेखील खेळाडूंना नोकरीच्या संधी मिळत नाही. तरी, या खेळाची एकच संघटना असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन क्रीडा संघटक व ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केलं. मॉडेल संघ रांजणखार, ता. अलिबाग यांच्यावतीने सुरू असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या अध्यक्षपदावरून ते उपस्थितांना संबोधित होते. या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नी आपण समाजाच्या सर्व थरात पाठपुरावा करु असे त्यांनी भाषणात शेवटी सांगितले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर पाटील, रमाकांत पाटील, सर्व पदाधिकारी व खेळाडू तसेच व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्तेविशाल जुईकर, नारंगी ग्रामपंचायत सरपंच उदय म्हात्रे, गिरीश पाटील, अलिबाग तालुका उपतालुका प्रमुख डॉ. जगन्नाथ पाटील, तसेच हशिवरे सरपंच शैला पाटील, तसेच रांजणखार ग्रामस्थ मंडळ व तालुक्यातील विविध स्तरातील मंडळी उपस्थित होते. तसेच अलिबाग मुरुडमतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमित नाईक यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version