पावसाळी साहित्य व शालेय साहित्यानी दुकाने सजली

| खांब | वार्ताहर |

अवघ्या दोन दिवसांवर सुरू होणार्‍या शाळा व रिमझिम स्वरूपात बरसणार्‍या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर पावसाळी हंगामात लागणारे साहित्य व शालेय साहित्यानी दुकाने सजली आहेत. साहित्य खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील व शहरी भागातील दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शालेय विद्यार्थी व त्यांचे पालकही खरेदीमध्ये व्यस्त झाले आहेत. वाढत्या महागाईची झळ पावसाळी हंगामात लागणारे साहित्य व शालेय साहित्याला बसली असून, प्रत्येक वस्तूंची किंमत 10 ते 20 % वाढली असली तरी, खरेदीचा उत्साह मात्र दिसून येत आहे. रोहा तालुक्यातील असलेले रोहा शहर व कोलाड, खांब, सुतारवाडी, धाटाव, नागोठणे, कोकबण, चणेरा आदी छोट्या-मोठ्या बाजारपेठा पावसाळ्यात लागणार्‍या सर्व साहित्यांनी सजल्या आहेत.

Exit mobile version