एचआयव्ही बांधीतांच्या औषधांचा तुटवडा; रुग्णांचा जीव टांगणीला

। अलिबाग । भारत रांजणकर ।
एचआयव्हीबाधितांनी नियमीत औषधी घेतल्यास विषाणूची वाढ होण्याची प्रक्रिया थांबते. ङ्गएआरटी ड्रग्सफ योग्य पद्धतीने व नियमित घेणे हा या उपचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु रायगड जिल्ह्यातील ङ्गएड्स नियंत्रण सोसायटीच्या समुपदेशन केंद्रावर (एआरटी) एचआयव्हीबाधितांना नि:शुल्क मिळणार्‍या औषधांचा तुटवडा पडला आहे. बाहेर या औषधांच्या किमंती सामान्यांना परडवणार्‍या नाहीत. परिणामी, रुग्णांचा जीव टांगणीला लागला असून रोग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात असणार्‍या तीन एआरटी सेेंटरपैकी फक्त लोधिवली येथील धिरुभाई अंबानी रुग्णालयातच पुरेसा साठा उपलब्ध आहे.
रायगड जिल्ह्यात 4 हजार 500 एचआयव्ही रुग्ण आहेत. त्यापैकी 4 हजार रुग्ण लोधिवली येथील धिरुभाई अंबानी रुग्णालयातील केंद्राच्या संबंधीत आहेत. तर जिल्हा रुग्णलयातील एड्स नियंत्रण सोसायटीच्या समुपदेशन केंद्र तसेच एमजीएम रुग्णालयाच्या केंद्रावर एकूण 2 हजार 500 एचआयव्ही पॉझीटिव्ह म्हणून जगताना बहुतेकदा अज्ञान आणि गैरसमजापोटी औषधांबाबत रुग्णांमध्ये जागरुकता नसते. नि:शुल्क मिळणारे औषध अचानक बाहेरून विकत घेण्यास त्यांची मनस्थिती नसते. काहींची आर्थिक परिस्थीती नसते. फार कमी जण पदरमोड करून बाहेरून औषध विकत घेतात. याचा परिणाम, आजार वाढण्यावर होतो. मेडिकल, मेयोसह सर्वच ङ्गएआरटी सेंटरफवर गेल्या काही महिन्यांपासून एचआयव्हीबाधितांसाठी फारच आवश्यक असलेले टॅब डिटीजी 50 एमजीफ व ङ्गटॅब एलव्हीपी/आर 250 एमजीफ यासह इतरही औषधांचा तुटवडा पडला आहे. त्यामुळे सध्या पाच सहा दिवस पुरतील एवढाच साठा असल्याचे सुत्रांनी सांगितले. लहान मुलांसाठी लागणारे डीटीजी तसेच लोपीनावीर, रिटोनावीर या औषधांचाही तुटवडा आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील एसआरटी केंद्रातर्फे गेल्या महिन्यात रिलायन्स एसआरटी सेंटरकडे मागणी करुन 3 हजार टॅब डिटीजी 50 एमजीफ व 1 हजार 200 ङ्गटॅब एलव्हीपी/आर 250 एमजीफ साठी सीएसआर फंडातून मागणी करण्यात आली होती. यासाठी 34 लाख 20 हजार रुपयांच्या निधीची गरज आहे. मात्र रिलायन्स रुग्णालयाने त्यांच्या केंद्रापुरतेच सदर औषधांचा साठा खरेदी केला. त्यामुळे इतर दोन केंद्र औषधांविना वंचितच राहिले आहेत. त्याचप्रमाणे ओएनजीसी कंपनीकडे देखील सीएसआर फंडातून औषध खरेदी करण्यासंबंधी विनंती करण्यात आली आहे. तथापि सीएसआर नोंदणी अभावी सदर खरेदीसाठी उशिर होणार असून सर्व सोपस्कार पुर्ण होताच खरेदी होऊन दिलासा मिळणार आहे. मात्र तोपर्यंत रुग्णांना स्वतः औषधे खरेदी करावी लागणार आहे. सदर औषधांचा संपूर्ण महाराष्ट्रभर तुडवडा आहे. नॅकोमध्ये त्यासंदर्भात प्रोसिजर सुरु आहे.

सदर औषधांचा महाराष्ट्रभर तुटवडा असून सीएसआर फंडातून रिलायन्स एसआरटी केंद्र आणि ओएनजीसी कंपनीकडे मागणी करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्व प्रोसिजर पुर्ण झाल्यानंतर औषधांचा पुरवठा सुरळीत होईल.

डॉ संजय माने


Exit mobile version