उरणमधील शेकापची ताकद दाखवून द्या; आ.बाळाराम पाटील यांचे आवाहन

| उरण | वार्ताहर |
उरण मधील कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने वर्धापनदिला उपस्थित राहून ताकद दाखवावी,असे आवाहन आमदार बाळाराम पाटील यांनी केले आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने उरण येथे समाज प्रबोधन शाळा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना ते पुढे म्हणाले की, देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा होत असतानाच शेतकरी कामगार पक्षाचा देखील अमृतमहोत्सवी वर्धापनदिन 2 ऑगस्टला पेण तालुक्यातील वडखळ येथे संपन्न होणार आहे. पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळत असते.आगामी काळात पक्षाच्या कार्यकर्त्यांना विविध निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहणे गरजेचे आहे,असे आवाहन आमदार बाळाराम पाटील यांनी केले.

यावेळी तालुका चिटणीस मेघानाथ तांडेल यांनी उरण तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे नियोजन केले जाणार आहे उरणचा बालेकिल्ला शेकाप खेचून आणल्याशिवाय राहणार नाही यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आगामी येणार्‍या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायत निवडणुका मध्ये शेकाप आपली रणनीती निश्‍चित करून लाल बावटा फडकवल्याशिवाया राहणार नाही असे सांगितले.

यावेळी शेकापचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, ज्येष्ठ नेते काका पाटील, तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल, महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा घरत, माजी सभापती नरेश घरत, माजी जि.प.सदस्य सीताराम नाखवा, जीवन गावंड, माजी उपसभापती महादेव बंडा, सहचिटणीस सुरेश पाटील, विधी सेलचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड सचिन जोशी, पुरोगामी युवक संघटना जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष रमाकांत म्हात्रे यशवंत ठाकूर महादेव बंडा भारत थळी यांच्यासह उरण तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version