अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील श्रावणी देवेंद्र पोकळ हिने ऑनलाईन लाठी राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक पटकावित नेत्रदीपक कामगिरी केली. ही स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेमध्ये एकूण अकरा राज्यांतील चारशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
श्रावणीने मिळविलेल्या यशाबद्दल रायगड जिल्हा लाठी असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद मसाल, सेक्रेटरी प्रियांका गुंजाळ, सहसचिव सिद्धेश सतविडकर तसेच कमिटी मेंबर रोहित भायदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करण्यात आला.






