श्री साई क्रीडा मंडळ कबड्डी स्पर्धा

विजय क्लब, जय भारत क्रीडा, अंकुर स्पोर्टस्‌‍‍ उपांत्यपूर्व फेरीत

| मुंबई | प्रतिनिधी |

विजय क्लब, जय भारत क्रीडा, अंकुर स्पोर्टस्‌‍‍ यांनी श्री साई क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या प्रथम श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मफतलाल कंपाऊंड, लोअर परेल येथील स्व. दत्ता गोताड क्रीडांगणावर झालेल्या तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सामन्यात विजय क्लबने अटीतटीच्या लढतीत शिवशक्तीचे आव्हान 38-32 असे संपुष्टात आणले. विश्रांतीपर्यंतच्या खेळात 16-18 अशा पिछाडीवर पडलेल्या विजय क्लबने विश्रांतीनंतर आपल्या आक्रमणाची धार वाढवीत सहा गुणांच्या फरकाने विजय साकारला.

दुसऱ्या सामन्यात जय भारत क्रीडा मंडळाने यंग विजय मंडळावर 49-39 अशी मात केली. आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात 21-11अशी आघाडी घेणाऱ्या जय भारतने उत्तरार्धात संयमी खेळ करीत आपला विजय साकारला. तर अंकुर स्पोर्टस्‌‍‍ ने पिंपळेश्वर मंडळाला 50-15 असे सहज नमवित आगेकूच केली. धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या अंकुरने पहिल्या डावात 27-07 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात खेळाची गती कायम राखत गुणांचे अर्धशतक गाठले.

Exit mobile version