श्रीसेवाशक्ती पतसंस्थेस बँको पुरस्कार जाहीर

| अलिबाग | प्रतिनिधी |

सहकार क्षेत्राला बळकटी मिळावी या उद्देशाने अविज पब्लिकेशन, कोल्हापूर आणि गॅलेक्सी इन्मा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गेली दहा वर्षे पतसंस्था आणि सहकारी बँकांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. याच कामाचा एक भाग म्हणून प्रामाणिक आणि चोख काम बजावणाऱ्या, सरकारी कायदे आणि नियमांची चौकट सांभाळून प्रगती साधणाऱ्या पतसंस्थांचा हुरूप वाढवण्यासाठी बँको पतसंस्था सहकार परिषद आणि बँको पतसंस्था ब्ल्यू रिबन हा संयुक्त कार्यक्रम राबवला जात आहे. त्याअंतर्गत अलिबाग तालुक्यातील चोरोंडे येथील श्री सेवाशक्ती ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेस बँको पुरस्कार जाहीर झाला आहे.

तज्ज्ञ निवड समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार श्रीसेवाशक्ती पतसंस्थेची बँको पतसंस्था ब्ल्यू रिबनसाठी निवड करण्यात आली आहे. या पतसंस्थेची प्रगतीची घोडदौड सुरु आहे. या पतसंस्थेत 30 कोटी 25 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. 23 कोटी 45 लाख रुपयांचे कर्ज वाटप झालेले असून, 11 कोटी 35 लाखांची गुंतवणूक केलेली आहे. भाग भांडवल 1 कोटी 93 लाख रुपयांचे आहे. सी.डी. रेश्यो 70 टक्के, रोखता निधी, तरलता निधी, सीआरएआर यांचे योग्य प्रमाण, अशी या पतसंस्थेची सुदृढ अवस्था आहे.

ही पतसंस्था 9001-2015 मानांकन प्रमाणित असून सतत 6 वर्ष बँको पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा सतत दोन वर्ष दीपस्तंभ पुरस्कार मिळाला आहे. स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग अ या पतसंस्थेने मिळवला आहे. तत्पर विनम्र सेवा, सर्व व्यवहारांकरीता एसएमएस सेवा, ठेवींवर आकर्षक व्याजदर, अल्प व्याजदरात त्वरीत कर्ज, संगणकीकृत अर्थिक व्यवहार व वातानुकुलीत सेवा ही या पतसंस्थेची वैशिष्ठे आहेत.

या पतसंस्थेचे अध्यक्ष सिताराम शामराव कवळे, उपाध्यक्षा संपदा सुहास दाबके, खजिनदार स्मिता सुरेश राऊत, सदस्य नितीन नारायण अधिकारी, संतोष राजाराम राऊत, केशव वासुदेव चांदोरकर, सुनिल दशरथ थळे, राजन गोविंद नार्वेकर, समद बद्रुद्दीन कूर, तज्ञसंचालक प्रकाश पांडूरंग ठाकूर या सर्व संचालकांचे या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून या पुरस्काराने सोमवार, 12 ते 14 फेब्रुवारी 2024 या दरम्यान डेल्टिन रिसॉर्ट, दमण येथे करण्यात येणार आहे.

Exit mobile version