श्रेयंका पाटील स्पर्धेतून बाहेर

। कोलंबो । वृत्तसंस्था ।

भारतीय महिला संघ सध्या श्रीलंकेचे यजमानपद असलेल्या टी-20 आशिया चषकात खेळत आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात शानदार सुरुवात केली आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना 7 गडी राखून जिंकला होता. आता भारतीय संघाला ऑफस्पिनर श्रेयंका पाटीलच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. ती बोटाला फ्रॅक्चर झाल्याने संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात श्रेयंका पाटीलला झेल घेताना दुखापत झाली होती. श्रेयंकाला तिच्या डाव्या हाताच्या सर्वात लहान बोटात फ्रॅक्चर झाले आहे, मात्र तरीही तिने या सामन्यात गोलंदाजी सुरूच ठेवली, 3.2 षटकात केवळ 14 धावा देत 2 बळी घेतले. श्रेयंकाच्या या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने पाकिस्तानला 108 धावांवर गुंडाळले होते.


Exit mobile version