श्रेयस अय्यरचा खेळ सुधारतोय

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यरने आपल्या फिटनेसचा पुरावा सादर केला आहे. त्याचबरोबर त्याने आशिया चषक सुरू होण्यापूर्वी श्रेयसने बंगळुरूमध्ये सराव सामना खेळला होता, ज्यामध्ये त्याने 199 धावा ठोकल्या होत्या. गेल्या वर्षी मार्चपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या श्रेयसने एनसीएमधील सराव सामन्यात केवळ 199 धावांची खेळी केली नाही तर संपूर्ण 50 षटके क्षेत्ररक्षणही केले. त्याच्या या सुधारलेल्या खेळीने बीसीसीआयला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अद्याप अशी प्रगती केएल राहुलबाबत होत नसल्याने थोडी धाकधुकही वाढली आहे.

अय्यरने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या सराव सामन्यात 199 धावा केल्या आहेत. त्यानंतर संपूर्ण 50 षटके क्षेत्ररक्षण केले. सराव सामना 3-4 दिवसांपूर्वी झाला होता. तो गेल्या दोन महिन्यांपासून बंगळुरूमध्ये आहे. येथे राहून तो रिकव्हरी लक्ष केंद्रित करत आहे. त्याच्यासाठी सर्व काही ठीक चालले आहे. श्रेयसच्या या खेळीनंतर भारतीय निवड समितीच्या चौथ्या क्रमांकाची समस्या निश्चितच काहीशी कमी झाली आहे. श्रेयस अय्यरने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो ट्रेनर रजनीकांत शिवग्ननम आणि मेडिकल चीफ नितीन पटेल यांच्यासोबत दिसत आहे. त्यानी लिहिले की, हा एक लांबचा प्रवास आहे. पण या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली आणि मला मदत केली त्या सर्वांचा मी ऋणी आहे. नितीन भाऊ, रजनी सर आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे कर्मचारी यांचे आभार. यासोबतच बाहेरच्यांचेही आभार.

विशेष म्हणजे मार्च 2023 पासून अय्यर संघातून बाहेर आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत 10 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान 666 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. अय्यरने 42 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1631 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने दोन शतके आणि 14 अर्धशतके केली आहेत. त्याने 49 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1043 धावा केल्या आहेत.

राहुल अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही
श्रेयस अय्यरने त्याच्या तंदुरुस्तीचा पुरावा निवडकर्त्यांना आणि संघ व्यवस्थापनाला दिला आहे, परंतु केएल राहुलच्या दुखापतीबाबत कोणतेही ताजी अपडेट समोर आलेली नाही. जेव्हा निवडकर्त्यांनी राहुलला आशिया चषकाच्या संघात स्थान दिले तेव्हा असे सांगण्यात आले की त्याला अजूनही थोडीशी दुखापत आहे, परंतु तो त्याच्या रिकव्हरीकडे पूर्ण लक्ष देत आहे.
Exit mobile version