मुरुडमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीर संपन्न

| कोर्लई | प्रतिनिधी |

मुरुड नगरपरिषदेच्या संतोष तवसाळकर सभागृहात श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीर उत्साहात संपन्न झाले. सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन शिवप्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करुन तहसीलदार आदेश डफळ व नगरपरिषदचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख काळे साहेब, मुरुड नगरपरिषद चे उपाध्यक्ष वीरेंद्र भगत,माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर व नगरसेवक रुपेश रणदिवे, प्रमिला सुभाष माळी, पांडुरंग आरेकर, यास्मिन कादीरी, नगमाना खानजादे, नितीन आंबुर्ले, अंकिता गुरव, प्रीता चौलकर, शहर अध्यक्ष दर्शन काळेबेरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

प्रॉपर्टी कार्ड बाबत मुरुडचे उपअधीक्षक भूमी अभिलेख काळे साहेब यांनी माहिती दिली. सदर शिबिरामध्ये महसूल व नगरपरिषद विभागामार्फत विविध सेवा उत्पन्नाचे दाखले 17 ,मंजूर फेरफार 10, डिजिटल सातबारा 114, 8 अ 68, दुय्यम रेशन कार्ड 9, आधी दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच सदर शिबिरात कार्यक्रमाच्या अनुषंगाने नगरपरिषद हद्दीतील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी उपस्थित राहून नागरिकांचे नमुना सहा 9, सात 62, आठ 37 चे फॉर्म भरून घेतले व प्रोजेनी मॅपिंग करण्यात आले. सदर शिबिरात संगायो 04, पुरवठा रेशन कार्ड 09, आधार कार्ड 07, मोजणी विभाग 20, सेतू सुविधा 37, नगरपरिषद असेसमेंट उतारे 04, रहिवाशी दाखले 13, जन्म दाखले 60, मृत्य दाखले 52 आदी अर्ज प्राप्त झाले व सदर शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

Exit mobile version