श्री केळंबादेवीचे मंदिर दर्शनासाठी खुले

। खरोशी । वार्ताहर ।
शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार पेण तालुक्यातील खरोशी येथील श्री केळंबादेवीचा नवरात्र उत्सव सुरू झाला असून दर्शनासाठी भाविक तोंडाला मास्क लावून व सॅनिटायझरचा योग्य वापर करून दर्शन घेत आहेत. पेण तालुक्यातील खरोशी येथील स्वयंभू व जागृत देवस्थान असलेले तसेच नवसाला पावणारी हाकेला धावणारी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भक्तांना माऊलीचे दर्शन व्हावे यासाठी येथील खरोशी ग्रामस्थ, गावपंच तसेच यावर्षी घरत मंडळी खूप मेहनत घेत आहेत. मोफत पाणी, चहा, प्रसाद, भंडारा देण्यासाठी महिला आनंदाने वाटप करण्यात मग्न दिसतात. दिवसभरात सकाळी येथे दररोज चार महाआरत्या केल्या जातात. आपल्या मनातील इच्छा एक वर्षाच्या आत माऊली पुर्ण करते आणि त्याचा प्रत्यय म्हणून दर्शनासाठी आलेला भाविक माऊली चरणी मस्तक ठेवतो.

Exit mobile version