श्री सदस्यांनी केले गणपती मूर्तींचे पुनर्विसर्जन

। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड व एकदरा परिसरातील दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन रविवारी मुरुडच्या समुद्रकिनारी मोठ्या संख्येत पार पडले होते. हजारोच्या संख्येने गणरायांच्या मूर्तींचे विसर्जन मुरुड व एकदरा खाडीत करण्यात आले होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या मूर्ती पुन्हा दुसर्‍या दिवशी किनारी लागल्या होत्या. त्या मुर्त्यांचे धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पुन्हा विधिवत विसर्जन करण्यात आले. मुरुड समुद्रकिनारी प्लास्टर ऑफ पॅरिसचे विसर्जन न झालेल्या गणपतींच्या मूर्ती सोमवारी सकाळीकिनारी आढळून आल्या. मुरुड समुद्रकिनारी विसर्जित न झालेल्या सुमारे 65 गणेशमूर्ती व एकदरा खाडीलगत सापडलेल्या 5 गणेशमूर्ती रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी व विश्‍वस्त सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एका नौकेत जमा करून त्या मूर्तींचे खोल समुद्रात पुनःविसर्जन केले. तसेच तालुक्यातील मजगाव खाडीकिनारी विसर्जित न झालेल्या गणेश मूर्तींचे सायंकाळी पुनर्विसर्जन करण्यात आल्या.

Exit mobile version