| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील शिवतेज मित्र मंडळ देऊळवाडी आंबवली यांच्यावतीने तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेतून सद्गुरु दत्ताराम तु. जगताप व समाजसेवक दिवंगत विश्वासभाऊ महिपत थोरे स्मृती चषक 2026 भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट स्पर्धेचे यंदाचे तिसावे वर्ष मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाले. तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे 24 नोंदनीकृत क्रिकेट संघ या स्पर्धेत खेळले. सर्व सामने रोमहर्षक झाले.
शिवतेज मित्र मंडळ गेली 30 वर्ष सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात कार्यरत असून देऊळवाडीच्या एकीच्या बळावर दरवर्षी क्रिकेट स्पर्धा व विविध उपक्रम राबवत असतात. यावर्षीच्या क्रिकेट स्पर्धेनिमित्ताने आलेल्या सर्व खेळाडूंची, सर्व प्रेक्षकांची व पाहुण्यांची स्नेहभोजनाची देखील व्यवस्था करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. स्पर्धेचा निकाल श्रीराम मंदिर ट्रस्ट जगदंब खुटिल, उपविजेता: आशीर्वाद तुडील, तृतीय क्रमांक: जन्नीदेवी क्रिकेट संघ जुइ संघानी प्राप्त केला. वैयक्तिक पारितोषिके: मालिकावीर: राहुल सुकुम (खुटिल), उत्कृष्ट गोलंदाज: शुभम (जुई), उत्कृष्ट फलंदाज: दिपेश बैकर (तुडील), बेस्ट कीपर: राहुल सुकुम (खुटिल), सिक्सर किंग: दिपेश बैकर (खुटिल), चौकार किंग: प्रवीण भावे (जुई) उत्कृष्ट क्षेत्ररक्षक: स्वप्नील चोरगे (छ. गेळ आंबवली), सर्वोत्कृष्ट खेळाडू: राहुल सुकुम (खुटिल) विशेष चषक: नारायण उमासरे (खुटिल) यांना देण्यात आली.







