श्री सदस्यांनी फुलवली वनराई

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
| पाताळगंगा | वार्ताहर |
धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून तसेच आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांमध्ये खालापूर तालुक्यातील सर्वच ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आल्याने रविवारी शेडवली फाटा येथे वनजमिनीत लावण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या वृक्षांची स्वच्छता आणि संवर्धन करीत असल्याचे श्री सदस्यांनी सांगितले. आज हे वृक्ष डौलाने उभे राहिले आहेत. वृक्षांची लागवड आणि संवर्धनाबरोबर वृक्षांना औषध फवारणी, खते, झाडांच्या मुळाजवळ माती देणे, वृक्षांच्या बाजूला वाढलेले गवत काढून गुरांपासून या वृक्षांचे संरक्षण व्हावे यासाठी झाडांभोवती तारेचे कुंपण घालणे आदी कामे श्री सदस्य मनापासून करीत आहेत. प्रत्येक सदस्य स्वतःजवळ असलेली पदवी विसरून या कार्यासाठी हातभार लावत आहे. यामुळे या ठिकाणी सध्या वनराई फुलल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री सदस्यांनी पिंपळ, निलगिरी, कडूनिंब, तान्हन, करंज, अर्जुन, रीठा, सफकर्णी, कुंतजिवा, निंबारा, रेनट्री, वड, गुलमोहर, ऑस्ट्रोलियन, सुबाबुल, बेहडा यासारख्या वृक्षांची लागवड करण्यात आली होती. आज संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

पावसाळ्यामध्ये वाढलेले गवत, झुडपे श्री सदस्यांनी साफ करून वृक्षांना नवसंजीवनी दिली आहे. वृक्ष म्हणजे मानवाचे फुफ्फुस आहे. वृक्ष नसल्यास मानवाला शुद्ध ऑक्सिजन मिळणार कसा? – श्री सदस्य

वृक्षसंवर्धन काळाची गरज
वृक्ष लागवड केल्याने पर्यावरणाचा समतोल जो ढासलेला आहे. तो अबाधित राहण्यास मदत होणार आहे. आज अनियमित पडणारा पाऊस याला एकमेव कारण म्हणजे वृक्षांची कत्तल, यामुळे आगामी काळातील धोके ओळखता वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे.

Exit mobile version