श्री शिव शंभु प्रतिष्ठान वर्धापन दिनी रक्तदान

| श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्री शिव शंभु प्रतिष्ठान यांच्या चतुर्थ वर्धापन दिनाचे औचित्यसाधुन गुरुवार (5) श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावातील अखंड आगरी समाज मंदिरात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी वडवली ग्रामपंचायत सरपंच प्रियांका नाकती, दिपक कांबळे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शिबीरात जिल्हा रुग्णालय अलिबाग रायगड रक्तकेंद्रातर्फे डॉ. दिपक गोसावी रक्तसंक्रमण अधिकारी,हेमकांत सोनार रक्तपेढी तंत्रज्ञ ,आकाश सावंत, मंगेश पिंगळा ,महेश घाडगे आदींनी रक्तसंकलनाचे काम केले. यावेळी 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी प्रियांका नाकती, दिपक कांबले, गणेश नाकती, नवनाथ कांबले,प्रतीक्षा चौलकर ,अवंतिका चाळके मनीषा कांबले सुचिता धनावडे सुशीला नाकती यांनी रक्तदान उस्पृतपणे रक्तदान केले. महेश चौलकर, रुपेश नाकती, स्वप्नील नाकती यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Exit mobile version