श्रीकृष्ण मजूर सहकारी संस्थेत प्रस्थापित सत्तेला शह

। चिपळूण । प्रतिनिधी ।
तालुक्यातील कामथे येथील श्रीकृष्ण मजूर सहकारी संस्थेवर गेली 15 वर्षे प्रस्थापित असणार्‍या माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप माटे यांच्या वर्चस्वाला शह देत, युवा कार्यकर्ते मंगेश माटे पुरस्कृत पॅनलने आपली सत्ता स्थापन केली आहे. संबंधित निवडणूक संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पार पडली.
या संस्थेच्या 12 जागांसाठी दोन्ही पॅनलचे 24 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत मंगेश माटे पुरस्कृत पॅनलचे नितीन कांबळी, सुनील ठसाळे, रामभाऊ बुदर, विष्णू रांगले, विजय महाडिक, हरिश्‍चंद्र घाणेकर, सौ. रिना माटे, श्रीमती अरुणा तांदळे असे 8 उमेदवार विजयी झाले आहेत. या उमेदवारांना विजयी करण्यात पॅनल प्रमुख मंगेश माटे यांच्यासह किसन माटे, दिनेश माटे, समीर काझी आदींनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
पॅनल प्रमुख मंगेश माटे यांच्यासह विजयी उमेदवारांचे आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, उद्योजक सचिन उर्फ पिंट्याशेठ पाकळे, बांधकाम व्यवसायिक साजन कुरुसिंगल, सामाजिक कार्यकर्ते संतोष खैर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण आदींनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
तर दिलीप माटे पुरस्कृत पॅनलला केवळ 4 जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे पॅनलप्रमुख दिलीप माटे यांचा दारुण पराभव झाला आहे. ही निवडणूक दोन्ही पॅनलकडून प्रतिष्ठेची बनविण्यात आली होती.

Exit mobile version