। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
निरुपणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणार्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा राज्य सरकारतर्फे देण्यात येणार्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा सोहळा प्रत्यक्ष पाहता यावा यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून हजारो श्रीसदस्यांची पाऊले खारघरच्या मैदानाकडे पडू लागली आहेत. शुक्रवारपासूनचे हे सदस्य कार्यक्रमस्थळी दाखल होऊन लागल्याचे चित्र दिसत आहे.
या कार्यक्रमासाठी दाखल होणारे श्रीसदस्य अत्यंत शिस्तीने येत आहेत.कार्यक्रमस्थळी कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता परंपरेप्रमाणे स्वच्छता मोहिमेत सहभागी होताना दिसत आहेत.तशी शिकवणच धर्माधिकारी परिवाराने या सदस्यांना शिकवणुकीतून दिल्याचे दिसत आहे.
या दाखल होणार्या श्रीसदस्यांची राहण्याची, निवासाची सोय सरकारतर्फे करण्यात आलेली आहे.सध्या कडक उन्ह पडत असल्याने त्यापासून बचाव करण्यासाठी श्रीसदस्य छत्र्याही घेऊन आलेले आहेत.अजूनही श्रीसदस्यांच्या येण्याचा ओघ सुरुच आहे.रात्रीपर्यंत सारे मैदान भरुन गेलेले असेल असा दावा पोलिसांनी व्यक्त केला आहे.या कार्यक्रमावर देखरेख ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा कार्यक्रमस्थळी ठाण मांडून आहे.शिवाय महामार्गावरही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध पर्यायी मार्ग देण्यात आलेले आहेत.